भाजपचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; भरवले जाणार खड्ड्यांचे चित्रप्रदर्शन

0
285

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच रंगलं आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपने नागरिकांना खड्ड्यांचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केलं आहे. तर नागरिकांनी पाठवलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

भाजपचे दक्षिण मध्यचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांच्या पुढाकाराने हे खड्ड्यांचे चित्रप्रदर्शन भरवले जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच या फोटोंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. भाजपने नागरिकांना फोटो काढून पाठवण्याचे आवहान केले असले तरी यामागे शिवसेनेला डिवचण्यासाठी हा प्रपंच केला जात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत शिवसेनेला बुडवणार; नितेश राणेंची टीका

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गोव्यात काँग्रेसला धक्का; 4 पैकी 2 आमदार भाजपच्या वाटेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here