“शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी”

0
503

गारगोटी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सध्या निवडणुकीच्या निमित्ताने गावात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. 9 जागांसाठी निवडणुक होणार आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब भोपळे, राजू पाटील, मानसिक दबडे यांची रांगणा माऊली आघाडी, तर भाजपकडून प्रविणसिंग सावंत, राष्ट्रवादीकडून संजय येडेकर, तर काँग्रेसकडून भुजंगराव मगदून यांची तळेमाऊली आघाडी रिंगणात उतरली आहे.

दरम्यान, बिद्री कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार के.पी.पाटील यांना साथ दिली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील व शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांच्यात राजकीय अंतर पडले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश आबीटकर यांना रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रावादीला सोबत घेतले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपात खरी ताकद असेल तर…; अमोल मिटकरी यांच भाजपला आव्हान

“सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here