मुंबई : राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्यांनी शुक्रवारी काळे झेंडे आंदोलन केलं होतं. त्यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
करोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपाची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले. लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली. भाजपाने यापुढे प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावे,” अशी खोचक टीकाही सचिन सावंत यांनी केली.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील- हसन मुश्रीफ
निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही; रोहित पवारांच उत्तर
लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख
ट्रेंडिंग घडामोडी –
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्तीhttps://t.co/vQBHdKrzWk@mlaharshvardhan #मराठी
— घडामोडी (@ghadamodi1) May 23, 2020