भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

0
461

मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं काल वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. मात्र, कल्याण सिंह यांच्या निधनानंतर देशात वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.

कल्याण सिंह यांच्या पार्थिवाला अभिवादन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी  भारताच्या ध्वजावर भाजपाचा झेंडा अंथरला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला.

‘आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच भारतीय राष्ट्रध्वजाचा हा अवमान झाला. प्रोटोकॉलप्रमाणे भारतीय ध्वजावर अन्य कोणताही ध्वज ठेवता येत नाही. ‘नेशन फर्स्ट’ ही घोषणा जनतेला फसवून केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा उद्धार करणाऱ्यांनीच आज उघडी पाडली. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा निषेध व्यक्त करत आहे., असं राष्ट्रवादीच्या फेसबुक अकाैंटवरून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर सोमय्या यांनी राणेंच्या बंगल्याचीही पाहणी करावी; शिवसेनेचं किरीट सोमय्यांना आव्हान

मंदिरे हा केवळ भावनेचा विषय नव्हे तर…; मनसेची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि राज ठाकरेंच्या युतीला माझ्याकडून शुभेच्छा- खासदार सुप्रिया सुळे

मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला, आता पुढचा नंबर अनिल परबांचा- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here