“भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं”

0
689

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांनीच दत्तक घेतलेल्या गावात त्यांना पराभव पत्करावा लागला. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं. जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत भाजपनं जिंकली, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. पदवीधर मतदार संघात सत्तेचा दुरूपयोग झाला हे 2 दिवसात सांगेल. याबद्दलचे पुरावे लवकरच देणार आहे, असंही चंद्कांत पाटील म्हणाले.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही- बाळासाहेब थोरात

जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार

…त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती; पश्चिम बंगाल निवडणुकीवरुन फडणवीसांचा टोला

भाजप सहा हजारापेक्षा जास्त जागांवर विजयी होईल- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here