आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय, याच पार्श्वभूमीवर त्यामुळे भाजप नेते नारायण राणेंनी निवडणुकांची तयारी जोरदार सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे, आमच्याकडे सेवा आणि माध्यम आहे, त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देईल, असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरें केलं मनसैनिकाच्या बाळाचं नामाकरण”
कोरोनाकाळात भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना चांगली सेवा पुरवली, तर दगावलेल्या कोरोना रुग्णांना पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे कोकणातील मतदारांनी भाजपला मतदान करावं, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन कोकण काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत, तसेच मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारीही राणेंकडे दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार
“…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा