मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वाढत्या कोरोना रूग्णांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन करावा लागेल अशी घोषणा केली. यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. अशावेळी महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही, अशा घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? असे अनेक प्रश्न दरेकरांनी यावेळी उपस्थित केले.
सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकणारी राज्य सरकारची कोणतीही भूमिका, कोणताही निर्णय भाजपा खपवून घेणार नाही., असंही दरेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकणारी राज्य सरकारची कोणतीही भूमिका, कोणताही निर्णय भाजपा खपवून घेणार नाही. – @mipravindarekar pic.twitter.com/IE0HrzZaH9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रातील लाॅकडाऊनसंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल- संजय राऊत
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शिवाजी विद्यापिठाला नॅक मानांकन
“तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप”