मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष सुरू असतानाच आता भाजपने आणखी एक घोषणा केली आहे. मुंबई महापौर पदाच्या यंदाच्या निवडणुकीत भाजप सहभाग घेणार नसल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आम्ही आता अभद्र युती करणार नाही.. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही’, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत…मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही… मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपा मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही. शिवाय, कोणत्याही विरोधीपक्षाशी युती करण्याची देखील भाजपाची इच्छा नाही, असंही शेलार यांनी म्हटल आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपद व सत्तेतील समान वाटा या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने NDA ला सोडचिठ्ठी दिली आहे.