आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजप यांच्यात एकमेकांवर सातत्यानं आरोप- प्रत्यारोप सूरूच आहेत. अशातच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार, असं विधान वारंवार होत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या आमदारांना मार्गदर्शन करताना यावेळी, भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी या आमदारांना यावेळी दिला.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांना देणार”
दरम्यान, आज महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
महत्वाच्या घडामोडी –
गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखविली; नितीन गडकरींची टोलेबाजी
मनसेचा आदी IPL च्या बसेसवर खळखट्याक; आता आदित्य ठाकरेंवर निशाणा
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपलं नशीब आजमावयला आले होते, पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला