मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावलं आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधलाय. भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते.
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या संख्येनं होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना आरक्षण मिळू नये, असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसंच भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात संघर्ष करेल आणि हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही पाटील यांनी सोमवारी दिला.
दरम्यान, समारोप प्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर आणि ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. मुंबईत झालेल्या या बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. संगमलाल गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
महत्वाच्या घडामोडी –
“माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास”
‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुण्यात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स; अमोल मिटकरींचा टोला, म्हणाले..
“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…”
“विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी, महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही”