नाशिक : शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मागील आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे अठरा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याला भाजपचे नाशिकचे प्रभारी व माजीमंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिक हा भाजपचा गड असून, यापुढेही तो कायम भाजपकडेच राहणार आहे. भाजपच्या गडाला सुरूंग लावून सत्ता मिळवण्याचे शिवसेनेने स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. संजय राऊतांचा भ्रमनिरास झाल्या शिवाय राहणार नाही, असं जयकुमार रावल म्हणाले आहेत.
हे ही वाचा : काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचं वारं; ‘या’ अभिनेत्रीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने संसदेत दोन खासदारांवरून चारशेच्या जवळपास आकडा गाठला. नाशिककरांची निष्ठा भाजपवर असल्याने आगामी निवडणुकीत महापालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक विजयी होतील. भाजप परिवारवादी पक्ष नसून, लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. ठराविक नेत्यांनी चालविलेला भाजप हा पक्ष नसून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात, असं जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पक्षात कुठेही गटातटाचे राजकारण नाही. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित काम करत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कल्याण आदी महापालिकांमध्येदेखील भाजप सत्ता स्थापन करून प्रस्थापितांना जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा दावाही जयकुमार रावल यांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”
“जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”
“भाजपला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”