आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर एकचा पक्ष असेल- देवेंद्र फडणवीस

0
261

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. यावरुन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा; खासदार संजय राऊत यांचं खुलं आवाहन

आजचा हा विजय भाजपच्या भविष्यातील विजयाची सुरुवात असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार असल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला.

दरम्यान, राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार?”

“बावनकुळेंच्या विजयाने महाविकासआघाडीला चपराक बसली”

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कट्टर राणे समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here