“सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फस्ट्रेशन आलंय”

0
264

सांगली : जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आले आहे हे यातून स्पष्ट होते, असंही  जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पवार जातीयवादी आहेत. त्यांच्या हातून अहिल्याबाईच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका घेत पडळकरांनी पवारांवर शाब्दिक हल्ले केले. याच सगळ्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांनी पडळकरांचा समाचार घेतला.

महत्वाच्या घडामोडी 

शिवसेना हिंदुत्वापासून दुरावली आहे; अमित ठाकरेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

‘ये नैना डरे डरे’! अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; पहा व्हिडिओ

“जळगाव हादरलं! ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यु”

“आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here