Home महाराष्ट्र सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात

सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, यासह अनेक गंभीर आरोप सिंग यांनी पत्रात केले आहेत. हे पत्रा पाठवण्यामागे परमबीर सिंग यांच्यावर कुठलातरी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी हे पत्र दिलं असावं असं वाटतं. पत्र दिलं गेलं म्हणून राजीनामा घेणं, हे योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

चौकशच्याबाबतीचा निर्णय झालेल नाही तर तसा विषय येतो कुठं? आम्ही या विषयात इतकं पुढं गेलोच नाही, एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं? भाजपा शेवटी विरोधी पक्षात आहे, सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो, जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्माण करण्याकरता त्यांना संधी वाटत आहे. फक्त सत्तेसाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खंडणी मागण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा आरोप

‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”

देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल