नागपूर : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर”
नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे- पृथ्वीराज चव्हाण
राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
“बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”