मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने प्रीतम मुंडेसह भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.
भाजपने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. वरळीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात ही भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकाच पक्षातील 2 नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वांसमोर झाली. त्यामुळेच या भेटीचे फोटो कालपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आम्ही दोघे भेटलो यात बातमी काय?, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा; भातखळकरांचा संजय राऊतांना खोचक सल्ला!
…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?; चित्रा वाघ यांचा सवाल
“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल”
फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप