Home देश भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश

भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जम्मू : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जम्मू व काश्मीरमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्समधील दोन बड्या नेत्यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हे दोन्ही नेते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू प्रांताचे अध्यक्ष असलेले देवेंद्रसिंग राणा व माजी मंत्री सुरजितसिंग सलाथिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र आता ते भाजपाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झालं आहे. येत्या एक-दोन दिवसांत ते भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देवेंद्रसिंग राणा यांची पक्षातून बाहेर पडण्याबाबत चर्चा होती. त्यांनी मागील आठवड्यात पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुला व उपाध्यक्ष ओमर अब्दुला यांची भेटही घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांसह त्यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली.

महत्वाच्या घडामोडी –

शेतकऱ्यांना चिरडलं, प्रियांका गांधींना रोखलं, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा- अशोक चव्हाण

भाजपने माझी किंमत 100 कोटी ठरवली याचा मला आनंद- नवाब मलिक

पुण्यात मनसे करणार आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे मैदानात

बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांचा पवारांना इशारा