Home महाराष्ट्र भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून बाळासाहेब थोरातांची टीका

भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून बाळासाहेब थोरातांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलडाणा : नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी, जनतेपेक्षा सरकार मोठे नसते हे लक्षात घेतलं पाहिजे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कृषी कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल दीड वर्ष वाट पहावी लागली. मात्र त्यांच्या आंदोलनाला यश आले, सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले आणि अखेर त्यांनी कायदे मागे घेतले, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. थोरात हे खामगावमध्ये आयोजित एका लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश

केंद्र सरकारने केलेले ही तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी होते. हे कायदे रद्द करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी केली. मात्र कायदे रद्द होत नसल्याचे दिसताच या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले आणि दिल्लीमध्ये तब्बल एक वर्ष आंदोलन चालले. याकाळात अनेकदा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपाने केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला आणि कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली, या काळात काँग्रेस शेतकऱ्यांच्यासोबत होती आणि यापूढेही असेल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राजकीय पोळी भाजा, पण…; एसटी संपावरुन अनिल परब यांचा पडळकर आणि खोतांना इशारा

आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली