मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणी बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपनं महाराष्ट्रात खरंच स्व:बळावर लढून पाहावं, असं आव्हान बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे कमी आमदार निवडून येतील, असा टोलादेखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी लगावला.
आमचं सरकार सुरळीत सुरु आहे. कोरोना संकट काळात सरकार चांगलं काम करत आहे. केंद्र सरकारने तर राज्याचा हक्काचा निधीदेखील दिला नाही. केंद्राने एनडीआरएफच्या निधी व्यतिरिक्त कोणता निधी दिला?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.
दरम्यान, त्याचबरोबर भाजपच्या टीकांमध्ये तथ्य नाही, असंदेखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले
ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; अभिषेक बच्चनचे ट्विट