“सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये”

0
152

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र या तपासावर भाजपकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात भाजपने राजकारण करू नये, असं काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.

सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या हा एक कायदेशीर विषय आहे. ही घटना मुंबईमध्ये घडली आहे. या सूंपर्ण प्रकरणाचा तपास कायद्याने मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास सुरु असून कोणीही यामध्ये राजकारण करू नये, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला विश्वास आहे की मुंबई पोलीस यामध्ये कोठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब प्रकरण; नवनीत राणांनी व्यक्त केला संताप

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांनी केला नवा खुलासा; म्हणाले…

खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये- उद्धव ठाकरे

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here