Home महाराष्ट्र भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत

भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

हे ही वाचा : राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?; ड्रग्स प्रकरणावरून पंकजा मुंडेचा सरकारला सवाल

कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे विधाने करण्याची सवय झाली आहे. तिच्या या विधानामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

 भाजपाला मोठा धक्का! ‘या’ अभिनेत्रीने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

भाजपच्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीची साथ; इंदापूरात चर्चेला सुरूवात

“स्टाॅयनिस-वेडची मॅच विनिंग खेळी; पाकिस्तानला हरवून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश”