Home पुणे ‘या’ नगरपरिषदेत भाजप-शिवसेना युती; सत्ता असूनही शिवसेनेला दिलं उपाध्यक्षपद

‘या’ नगरपरिषदेत भाजप-शिवसेना युती; सत्ता असूनही शिवसेनेला दिलं उपाध्यक्षपद

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून एकेकाळी मित्र असलेले भाजप-शिवसेना आता राजकीय शत्रू झाले आहेत. मात्र भाजप-शिवसेनेने आळंदी नगर परिषदेमध्ये कायम एकत्र राहण्याचा निर्धार केला आहे.

आळंदी नगरपरिषदेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असूनही, शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे याना आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करून भाजपने शिवसेनेला जवळ केले आहे.

मावळत्या उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

दरम्यान, पीठासिन अधिकारी तथा आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ही निवड जाहीर केली. शासन निर्देशाने झूम ऍप द्वारे उपनगराध्यक्ष पदाची सभा घेण्यात आली. या सभेला 16 नगरसेवक उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका

“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं; अण्णा हजारेंचा इशारा