Home महाराष्ट्र भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकरली; नवनीत राणांची ठाकरे...

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकरली; नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : अमरावतीत शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकने हा हटवला. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे सरकारला टार्गेट केलं.

हे ही वाचा : अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री, नंतर केला खुलासा, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमू लागल्या. मात्र अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी आमदार रवी राणा यांनी हा पुतळा बसवला होता. हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर शहरातील वातावरण तापलंय.

महत्वाच्या घडामोडी – 

औरंगाबादेत राजकीय पतंगबाजी! शिवसेना नेत्याच्या हाती पतंग,तर भाजप नेत्याच्या हाती चक्री; चर्चांना उधाण

भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, त्यामुळे…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला