आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. शिवसेनेकडून गोपिकिशन बाजोरिया तर भाजपकडून वसंत खंडेलवाल हे उमेदवार रिंगणात होते.
हे ही वाचा : नागपूर विधान परिषद निवडणूक; काँग्रेसला धक्का, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी
अकोला वाशिम बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. भाजपचे वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.
दरम्यान, अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले भाजपवर कडाडले
आगामी निवडणूकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या उत्तराने सर्वांना हसू आवरलं नाही
“लग्नात ग्रँड एन्ट्री घेत असताना नवरा-नवरीची झाली फजिती, पहा व्हिडिओ”