आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दाशरथे यांनी मुंबईत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : “Breaking News! राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दाैऱ्यावर होते. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. त्यानंतर दाशरथे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज दाशरथे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
राणा दाम्पत्यानं दिलेल्या आव्हानानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं जोरदार उत्तर, म्हणाले…
“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
असं कुठं असतं का किरीटजी?; स्वतःच नखाने मारून रक्त काढता, आणि मग नंतर…; रूपाली पाटलांचा घणाघात