Home महाराष्ट्र आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?

आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असतील, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ताराराणी आघाडीच्या कार्यालयात चंद्रकांत पाटील बोलत होते.

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी पाटील यांनी आवाडे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदा अमोल महाडीक आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे ‘हे’ मंत्री म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या ऋणात राहू इच्छितो!

दरम्यान, या घोषणेनंतर आवाडे समर्थकांनी राहुल हे लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राहुल आवाडे हे भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक; काँग्रेस-शिवसेनेला दिला मोठा धक्का

संजय राऊत निम्मे डाॅक्टर, त्यांचं डोकं तपासावं लागेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

भाजपचा ‘हा’ मोठा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?; लवकरच ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता”