Home पुणे भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार

भाजप-मनसेचं आता मिशन पुणे; देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे आज पुण्यात; रणनीती आखणार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच मागच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी नव्याने बांधलेल्या शिवतीर्थावर जाऊन सदिच्छा भेट दिली होती. त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे व भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वारं; रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिग्गज नेते पुण्यात आले आहेत. हे दोन्ही नेते दिवसभरात आपापल्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन पुढील रणनीती आखणार आहे.

दरम्यान, आज पुण्यात हे दोन्ही नेते आले असल्याने यांच्यात पुन्हा भेट होणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं भांडवल करणं हे भाजपच्या नेत्यांना चांगलं जमतंय”

नितेश राणे स्वत: थकबाकीदार, ते बँक काय चालवणार; शिवसेनेचा हल्लाबोल

कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्ट्राचार उघड करावा- रावसाहेब दानवे