आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत लवकरच भाजपचे पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय?, असं भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. कल्याणमध्ये आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर भाजप आमदार चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
हे ही वाचा : ‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’; एकनाथ खडसेंचा निशाणा
भाजपची ताकद वाढविण्यासाठी इतकी वर्षे ज्या कार्यकर्त्यांनी काम केले ते अचानक पक्ष सोडून जातात त्याचे आम्हाला दुःख आहे, असं म्हणत शिवसेनेत जाणाऱ्या त्या नगरसेवकांना चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेकडून अखेर या पक्षप्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडी सरकारला आता अवघे काही दिवस उरले आहेत- चंद्रकांत पाटील
सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतिर्थ’वर
किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?