लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच अभिमन्यू पवार यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच, त्यांचा मुलगा परिक्षीत यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
दरम्यान, अभिमन्यू पवार आणि त्यांचा मुलगा कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचं सांगितलं. तसेच, उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या लोकांनाही प्लाझ्मादान करण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाचा संसर्ग; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ
महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज- चंद्रकांत पाटील
“अखेर ठरलं! अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन”
सचिन सावंतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- देवेंद्र फडणवीस