बेळगावमध्ये भाजपने रचला इतिहास; महापालिकेवर भाजपचा झेंडा

0
337

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. समोर आलेल्या निकालाच्या अपडेटनुसार बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला आहे.

बेळगाव महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी लागणारा 29 चा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे 26 उमेदवार जिंकले असून, 9 ते 10 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे 4 उमेदवार निवडून आले आहेत.

दरम्यान, आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

करुणा शर्मा गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजपला धक्का! भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ आमदाराची शिवसेनेत होणार घरवापसी?”

मी वाघ आहे वाघ, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा; चित्रा वाघ यांचा जोरदार पलटवार

“मुंडेंनी कितीही स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला, तरी एक दिवस नियती त्यांना सोडणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here