आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजपाच्या नेत्यांची हजारो कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांनी मंदिराच्या जागा हडपल्या आहेत. विधानसभेमध्ये याबाबतचे पुरावे सादर करणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘बिनधास्त बोला विथ नवाब मलिक’ या विशेष मुलाखतीत मलिकांनी भाजपावर हल्ला चढवला.
भाजपा हा फुगा एक फुगा आहे आणि आता त्यातील हवा हळूहळू कमी होत चालली आहे. भाजपा हा फुग्यातील हवेसारखा आहे. त्यांच्याकडे ठोस असं काही नाही. पण ते आम्ही स्वच्छ आहोत, असं दाखवत आहेत. भाजपाच्या नेत्यांची हजारो कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांनी मंदिराच्या जागा हडपल्या आहेत. विधानसभेमध्ये याबाबतचे पुरावे सादर करणार आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
हे ही वाचा : शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार
दरम्यान, एकीकडे नारायण राणे म्हणतात की, मार्चपर्यंत महाविकास आघाडीची सरकार पडणार, तर दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हणतात की, हे सरकार आम्ही पाडणार नाही. कारण भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून सरकारला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या धमकीला आघाडीचा कुठलाच आमदार घाबरत नाही. मात्र, आता फडणवीसांनी स्वीकारले की, 2024 मध्ये आमचे सरकार येणार. परंतु त्यांचे कटकारस्थान चालणार नाही, असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे; एखाद्या लेखकाने लिहिलेलं मान्य नसेल तर शाईफेक करणे निंदनीय”
भाजपाकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
“मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल”