Home महत्वाच्या बातम्या ‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण रामे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना संकट मोचन हे नावं दिलं गेलं आहे. अनेक संकटं येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत, असा दावा सत्तार यांनी केलाय.

महत्वाच्या घडामोडी –

भिवंडीत काँग्रेसला खिंडार! ‘या’ माजी शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश; 10 नगरसेवकही लवकरच करणार पक्षप्रवेश

“मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”

2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस

“…तर मी त्याच्यासोबत झोपेन; हत्या प्रकरणेबाबत ‘या’ अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट”