मुंबई : भाजपाचे नेते कोणी आपल्याकडे बघत नाही ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर जेव्हा पहिल्यांदा दिल्लीला संसदेत पोचलो. तेव्हा भाजपचे नेते डावी-उजवीकडे बघून, कोणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवून अभिनंदन करत होते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी डावी-उजवीकडे कडे बघून भाजप च्या नेत्यांची ‘अॅक्शन’ करून दाखवली. आज दिवसभरातील त्यांचे कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता त्यांनी पत्रकारांना गप्पा मारण्यासाठी ‘देवगिरी’ वर बोलावलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस सरकार घालावल्याबद्दल आपलं अभिनंदन, असंच कदाचित् तेव्हा भाजपच्या नेत्यांना म्हणायचं होतं. असं मला वाटलं, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
-ट्रेलर रिलीजनंतर छपाकची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल नाराज
-महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असं जर भाजपला वाटत असेल तर भाजप मूर्ख- जितेंद्र आव्हाड
-IPL लिलाव 2020मध्ये सर्वात महागडा ‘हा’ खेळाडू ठरला
-माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाना