आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे चोर पोलिसाचा खेळ नसून विरोधी पक्षाची चाल गारूडी खेळासारखी आहे. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या उक्तीनूसार ते बोलत आहेत.वास्तविक पाहता प्रकृती अस्वाथामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही दिवस राज्याचा कारभार घरूनच करावा लागणार आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तिच्या आजारपणाचे भांडवल करून बदनामी कशी करावी हे भाजपच्या लोकप्रतिनिधींना चांगले जमतं, असं म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नासिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
हे ही वाचा : नितेश राणे स्वत: थकबाकीदार, ते बँक काय चालवणार; शिवसेनेचा हल्लाबोल
दरम्यान, विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारची बदनामी गारूडीच्या खेळासारखी चालवली आहे. गारूडी गावभर फिरत ढोल पिटून मुलाबाळांना जमवतो. नंतर हळूहळू मोठी माणसे आले की, ढोल वाजवणे थांबवून आपल्या जादूच्या करामतीने हातरूमाल, रिबिन, पैशांचे नाणे गायब करतो आणि भीतीयुक्त, विस्मयकारक पध्दतीने खेळ करून जमलेल्या लोकांकडून पैसे उकळतो. तोच प्रकार सध्या विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी करत आहेत, असं अनिता भामरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्ट्राचार उघड करावा- रावसाहेब दानवे
भाजपा नेत्यांच्या बेनामी संपत्तीचे पुरावे विधानसभेत सादर करणार; नवाब मलिकांचा गैाप्यस्फोट
शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार