Home महाराष्ट्र “राज्यातील भाजप नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण…”

“राज्यातील भाजप नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचे आकडे लपवल्याचा आरोप भाजप नेते वारंवार करत आहेत, अशातच गुजरातने कोरोनाचे आकडे लपवल्याचं सुप्रीम कोर्टात उघड झालं. यावरुन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

कोरोनाच्या मृतांची संख्या दडवली जात असल्याचा आरोप राज्यातील भाजपच्या सर्वच नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाच पण अहोरात्र कार्यरत असलेल्या कोविड योध्यांचाही अवमान केला. पण खरी आकडेवारी भाजपच्या आवडत्या गुजरातनेच लपवल्याचं सुप्रीम कोर्टात उघड झालं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “जोपर्यंत महाराष्ट्रात पप्पू आणि पेंग्विन शिवसेनेचं नेतृत्व करतील, तोपर्यंत भाजपला कोणीही रोखू शकत नाही”

दरम्यान, दुसरीकडं कोविडची लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कामाचं हाय कोर्टाने कौतुक केलं. त्यामुळं सत्याची थोडी जरी चाड असेल तर राजकीत हेतू साध्य करण्यासाठी राज्याची बदनामी आणि कोविड योध्यांचा अवमान केल्याप्रकरणी तोंडावर आपटलेले राज्यातील भाजपचे नेते आता तरी खेद व्यक्त करतील काय?, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पंतप्रधान मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली; म्हणाले…

सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा