मोठी बातमी! …’या’ कारणामुळे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढलं

0
5

सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासह शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांची जयंती आज रोजी राज्यात थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. यावेळी यावेळी ठाण्यातील एका गुरूद्वाऱ्यामधून राजकारणातील एका बड्या नेत्याला बाहेर काढण्यात आलं आहे.

गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाऱ्यात गेलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर तिथले सेवेकरी चिडल्याचा प्रकार घडला आहे.

ही बातमी पण वाचा : निडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

गुरुनानक जयंती असल्यानं तीनहात नाका परिसरात असलेल्या गुरुद्वाऱ्यात बरीच गर्दी होती. ठाण्याच्या दौऱ्यावर असलेले जे. पी. नड्डा गुरुद्वाऱ्यात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी नमस्कार केला आणि ते फोटो काढायला उभे राहिले. नड्डा यांच्यासह भाजप नेते मोठ्या संख्येनं आल्यानं कीर्तनात व्यत्यय आला. भाविकांचा खोळंबा झाला. त्यामुळे सेवेकरी संतापले. त्यांनी नड्डा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! सांगलीत भाजप नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, सांगली हादरली

“एकदा सत्ता द्या सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून दाखवतो”

“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार”, ‘या’ मोठ्या नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here