आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा नेत्या उमा खापरे यांनी सय्यद यांना इशारा दिला.
फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्यं केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललो तर लगेच प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती आहे. पण यानंतर त्या बाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या इतर नेत्यांबाबत वक्तव्यं केलं तर घरात घुसून बदडून काढू. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उमा खापरे यांनी दिला आहे. यावरून आता दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रूग्णालयात दाखल होणार; उद्या ऑपरेशन होण्याची शक्यता”
तुम्ही काय माझ्या घरात, शिवसेना भवनात घुसून बदडून काढणार आहात? म्हणजे तुम्हाला याव्यतिरिक्त दुसरं राजकारण करताच येत नाही. सुरुवात तुम्ही करायची आणि आम्ही काही बोललो की आम्ही वाईट होणार, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या टी.व्ही.9 मराठीशी बोलत होत्या.
“नक्कीच कोणाबद्दल अशी वक्तव्यं केली नाही पाहिजेत. जसे तुमच्यासाठी पंतप्रधान महत्वाचे आहेत तसा मुख्यमंत्र्यांचा दर्जा नाहीये का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? तुम्ही काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे का? काय करायचं ते करा…येताय ना माझ्या घऱी, पाहतेच मी, तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी उमा खापरेंना दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कोकणात राणेंची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला