‘लव्ह जिहाद’बाबत भाजप नेत्या, पंकजा मुंडेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

0
570

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जबलपूर : गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ‘लव्ह जिहाद’चा विषयाची चर्चा रंगत आहे. तसेच महाराष्ट्रासह देशात विविध प्रेमप्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’ झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. या सर्व प्रकरणावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

लव्ह जिहाद हा केंद्र सरकारच्या अजेंड्याचा भाग नव्हता. माझा विश्वास आहे की, प्रेम हे प्रेम असतं. प्रेमाला कोणतीही मर्यादा असू शकत नाही. जर दोन व्यक्ती निखळ प्रेमातून एकत्र येत असतील तर त्याचा आदर केला पाहिजे. पण महिलांना आंतरधर्मीय विवाहात फसवलं जात असेल तर याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजं., असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे पत्रकरांशी बोलत होत्या.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण असेल?; सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

लव्ह जिहाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्याचा भाग कधीच नव्हता. आजही ‘लव्ह जिहाद’सारखा कोणताही विषय मोदी सरकारच्या अजेंड्याचा भाग नाही. मोदी सरकारचा अजेंडा नेहमीच विकास आणि पुनर्विकासावर केंद्रीत असतो. देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर आहे., असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

“आनंद दीघेंच्या मृत्यूबाबत, ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले. …ते शिंदेंचं कारस्थान…”

“क्षुल्लक कारणावरून, शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा…; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”

धमकी प्रकरणावर आता खुद्द, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here