मुंबई : अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हण यांनी ट्वीट करत अजित पवारांना टोला लगावला.
“इंग्रजीत म्हटलं जातं, If you can’t convince them, confuse them… म्हणजेच आपण त्यांना पटवून देऊ शकत नसल्यास गोंधळात टाका. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने आता हाच प्रकार सुरु केल्याचं दिसतयं…” अशा अशयाचं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
इंग्रजीत म्हटलं जातं, If you can’t convince them, confuse them…
दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनं आता हाच प्रकार सुरू केल्याचं दिसतंय…#MahaPoliticalTwist https://t.co/TjWgR89KvB— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 24, 2019
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ट्विटनंतर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. या ट्विटला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.