नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. इम्पेरिकल डेटा सरकारने कोर्टात जमा केल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, आता मागास आयोग डेटा गोळा करण्याचे काम करणार आहे. आयोगाने डेटा गोळा करण्यासाठी 450 कोटी रुपये मागितले आहेत, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, ओबीसींना आरक्षण न देण्याची राज्य सरकारची भूमिका नसती तर आयोग बसवला नसता, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
साताऱ्यात राष्ट्रवादीचा भाजपला मोठा दणका; असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला; संजय राठोड यांनी केला खुलासा
ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्या- चंद्रशेखर बावनकुळे
“भाजपने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय, त्यामुळे CM नाही, PM बदला”