सांगली : भाजपतर्फे आज सांगलीच्या टिळक चौकात पालकमंत्री हटाव आंदोलन करण्यात आलं.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली. तसेच कोरोनाला हाताळण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. यावरून सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी पूर आला. अनेकांचं या पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. व्यापारी, शेतकरी, नागरिक यांचं नुकसान झालं. पण या पूरग्रस्तांना भरीव अशी मदत या महाविकास आघाडी सरकारकडून दिली गेली नाही., असा आरोपही भाजपकडून यावेळी करण्यात आला.
दरम्यान, सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रूग्णालयात दाखल”
“वंचितचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापूरहून मुंबईत”
कोरोना काळात महाराष्ट्र सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर सर्वांचं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे, हेच माहित नाही, त्याला काय किंमत द्यायची”