Home महाराष्ट्र “केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

मुंबई : मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काही दिवसांपूर्वी पार पाडला. यामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं नाही. यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन भाजपने एकप्रकारे उदयनराजेंचा अवमान केला आहे. भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, अशी टीका शशिकांत शिंदेनी यावेळी भाजपवर केली.

दरम्यान, उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असते. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी निश्‍चितपणे विकासकामे केली असती. मात्र, भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही याचे दु:ख वाटते, असंही शशिकांत शिंदेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ब्रेकींग न्यूज! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा मोठा निर्णय”

“मोठी बातमी! पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण”

मी नारायण राणेंना फोन केला होता, पण…- राज ठाकरे

“…तर खांद्याला खांदा लावून काम करु”; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य