मुंबई : राज्यात करोनाबरोबर राजकारणही शिगेला पोहोचलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधीमंडळ सदस्यत्व होण्याचा कालावधी जवळ येऊ लागला आहे. विधान परिषदेच्या निवडणूका रद्द झाल्यानं सरकारनं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आला. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा ठरावावर भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे.
भाजपला राज्यात अस्थिरता नको आहे. राज्यात अस्थिरता आणण्यात आणि मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय…,अमिताभ बच्चन यांच भावूक ट्विट
अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन; वयाच्या 68 वर्षी घेतला अखेरचा श्वास
इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- उद्धव ठाकरे
इरफान यांच्या निधनानंतर युवराज सिंगचं भावूक ट्विट