आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप नेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यात 5 वर्षे देवेंद्र फडणवीसांच्या विकासाचा कार्यकाळ आपण सर्वांनी बघितला आहे. भ्रष्टाचाराचा एकही डाग फडणवीस सरकारने लावून घेतला नाही. आता ‘दोन’ वर्षांत ‘वीस’ वर्षे मागे गेला आहे. या ठाकरे सरकारच्या अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : तेव्हा अजितदादा म्हणाले होते, अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो; धनंजय मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, की जनतेने आम्हाला आपले मानले. पण सरकारने जनतेला आपले मानले नाही. दोन वर्षांत राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. आमचे सरकार यातून मार्ग काढू शकते. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश
महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपचं सरकार येणं आवश्यक- प्रवीण दरेकर
“ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात”