मुंबई : देशात सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचीही कमतरता भासू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
कोरोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करत आहे. भाजपाला काय वाटतं की जनतेला आपल्या डोळ्यांसमोर होणाऱ्या मृत्युंचं सत्य दिसत नाही का? भाजपाच्या या खोटेपणाला कंटाळलेल्या समाजाने आँकडा ऐवजी आँखडा हा शब्द वापरायला हवा. कारण डोळ्याने जे पाहिलेलं असतं तेच खरं असतं., असा टोमणा अखिलेश यादव यांनी भाजपला लगावला आहे.
कोरोना को लेकर भाजपा सरकार द्वारा लगातार ‘झूठा आँकड़ा’ दिया जा रहा है. क्या भाजपा ये समझती है कि जनता को अपनी आँख से मौतों का सच नहीं दिख रहा.
भाजपाई झूठ से त्रस्त समाज को ‘आँकड़ा’ की जगह नया शब्द ‘आँखड़ा’ प्रयोग में लाना चाहिए क्योंकि आँख के देखे से सच्चा कोई आँकड़ा नहीं होता.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) May 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे- नवाब मलिक
“ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोना पाॅझिटिव्ह”
“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”
प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की…- रुपाली चाकणकर