Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला...

“उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला भिती”

रत्नागिरी : राम मंदिर भूमिपूजन सोहळा  येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत  होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

प्रभू रामचंद्र हे केवळ आणि केवळ भाजपचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे. राम मंदिर निर्मितीचा मार्ग ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नातून होतो आहे, त्यांची जाणीव ठेवणं आज आवश्यक आहे. पण दुदैवाने तसे होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, याची भाजपला भिती वाटत असेल, असं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, महाविकासआघाडीचे सरकार मजबूत आहे. सरकारमधील कुरबुरी सोडवण्यास महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

राज्याचा निकाल 95.30 टक्के, यावर्षीही मुलींचीच बाजी तर पुन्हा कोकण अव्वल

भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित,अन्यथा…; सामना’तून चंद्रकांत पाटलांना टोला

जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढतोय- निलेश राणे

शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला