Home नागपूर नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

नागपूर : नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले असून, त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणास्तव तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते भिडले असं सांगण्यात आलं आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याचं दिसून आलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राजकीय गांजाड्यांना शिवसेनेच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही”

“आम्हांला कोणी थप्पड देण्याची भाषा करू नये, अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही”

प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू; संजय राऊत म्हणतात…

“केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”