मुंबई : विधानपरिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार आहे. मात्र भाजपाने ऐनवेळी आपला उमेदवार बदलल्याने बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाने ऐनवेळी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवार बदलला असून बीडचे नेते रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. रमेश कराड हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली होती. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले होते.
दरम्यान, डमी उमेदवार म्हणून भाजपाकडून शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. मात्र भाजपाने अचानक अजित गोपछडे यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे रमेश कराड हे मुख्य उमेदवार ठरले असून त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र
करोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल- अजित पवार
भाजपला सोडचिठ्ठी देण्यावरुन एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले..
काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत