भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं; मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा टोला

0
156

मुंबई : भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं, हे सर्वांना माहिती आहे. भाजपने मंदिरं खुली करण्यासाठी जे आंदोलन आयोजित केलं आहे ते राजकारण डोक्यात ठेऊनच केलं असणार”, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आपल्या राज्यासाठी आणि लोकांसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. तसं कदाचित त्यांच्या धोरणात असेल किंवा भीतीपोटी केंद्राविषयी त्यांच्यातला कुठलाही नेता बोलू शकत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांना खरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकले आहेत. ते पैसे त्यांनी मागितले असते, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला- आशिष शेलार

आयपीएलच्या आधी चेन्नई सुपर किंग्जला धक्का; संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह

देवेंद्र फडणवीसांचा अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई पोलिसांकडे बोट

फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं, की लगेच ब्रेकिंग न्यूज; अजितदादांची टोलेबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here