आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी-चिंचवड : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशातच काल माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं विधान केलं होतं. यावरून आता शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही. आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील. तसेच चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत तेही पाहू., असा टोलाही सचिन अहिर यांनी यावेळी लगावला. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : मनसे म्हणजे एका आमदाराची…; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा टोला
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले असते तर देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने फोडफोडीच षडयंत्र केलंय, असा दावाही अहिर यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी; शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेला ‘हा’ नेता पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतला”
“सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”
शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट